बुरंबावडेवासीयांच्या गळ्यातील ताईत- सरपंच रविंद्र शिंगे

संकलन : साईनाथ गावकर

जर का माझ्या बाबासाहेबांनी, भारताची घटना लिहिली नसती तर,
मला ही सरपंच पदाची खुर्ची कदापि मिळाले नसती…

एरव्ही शायरी, कव्वालीतून प्रबोधन करणारे बुरंबावडे गावचे सरपंच रविंद्र शिंगे यांनी स्वतःच कर्तृत्व शून्यातून निर्माण केले आहे. गावाच्या विकासासाठी झटणारे हे नेतृत्व आजच्या घडीला बुरंबावडेवासीयांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

सुमारे ६०३ लोकसंख्या असलेला आणि दहा वाडी असलेला बुरंबावडे हे गाव. या गावचे सरपंच रविंद्र शिंगे हे महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. बत्तीस वर्ष महामंडळाच्या सेवेनंतर २०१६ साली सेवेतून निवृत्त झाले. या दरम्यान त्यांनी कणकवली, फोंडा, तळेरे, खारेपाटण, वैभववाडी येथे सफाई कामगार म्हणून काम केले. २००६ पासून ते अरुण दुधवडकर यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी शिवसेनेसोबत काम करायला सुरुवात केली. बुरंबावडे गावात शिवसेनेचे पॅनल आणले. बुरंबावडे सारख्या दुर्गम भागात एसटी सेवा अखंडपणे सुरू ठेवली. राजकारणाबरोबरच कव्वाली शायरीतुन प्रबोधन करत असतात. आदर्श बौद्ध विकास मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून रविंद्र शिंगे यांची ओळख आहे. तसेच सामाजिक एकोपा राखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी मोठ्या दिलदारपणे रविंद्र शिंगे या बौद्ध समाजातील सामान्य कार्यकर्त्याला सर्वसाधारण मधून थेट सरपंच पद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे समस्त बौद्ध समाजात समाधानाचे वातावरण आहे. देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावातील ग्रामस्थांनी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत जनतेतून एका बौद्ध समाजाचे रविंद्र शिंगे यांना सरपंच पद देऊन खुल्या प्रवर्गातून भरघोस मतांनी निवडून आणले. बुरंबावडे गावाने या ग्रामपंचायत निवडणुकीत घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय प्रस्थापित राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना विचार करायला लावणारा होता.

सरपंच रविंद्र शिंगे यांची ‘क्रेझ’-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत असलेल्या सरपंच रविंद्र शिंगे यांची जनमानसात निश्चितच वेगळी क्रेज आहे. शायरी, कव्वालीतून प्रबोधन करण्याचे त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यामुळे कुणीही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे सहज आकर्षित होतो. सरपंच रविंद्र शिंगे यांनी एकदा संवाद साधायला सुरुवात केली की त्यांना फक्त आणि फक्त ऐकत बसावं अस हे व्यक्तिमत्व. गावातील लोकांना आपल्या गोड स्वभावाने जोडून ठेवणारे रविंद्र शिंगे सांगतात, मी फक्त भले बौद्ध समाजाचा सरपंच असेन, पण माझ्या हातून सर्व समाज घटकांची सेवा झाली पाहिजे यासाठी मी नेहमी झटत असतो.

खा. विनायक राऊत यांच्यामुळे पाणी प्रश्न सुटणार-
खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून गावातील पाणीटंचाई दूर करण्याकरता दहा लाखाचा फंड मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा विषय रेंगाळला आहे. तरी कोरोनाचे संकट गेल्यानंतर हे काम पूर्ण होणार असून संपूर्ण गावाच्या पाण्याची सोय या योजनेच्या माध्यमातून होणार आहे, असे सरपंच रविंद्र शिंगे यांनी सांगितले.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचे बहुमूल्य सहकार्य-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनातून ५७ लाख रुपयांचा निधी कोल्हेवाडी रस्त्यासाठी मिळाला आहे. तसेच बौद्धवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले. ग्रामपंचायतीपासून पुढे राष्ट्रीय महामार्ग १७७ बुरंबावडे गावठणवाडी कोणेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणसाठी मंजूर झाला असून हे देखील काम लवकरच काम सुरू होईल, असे सरपंच रविंद्र शिंगे यांनी सांगितले.

गणेश चतुर्थी पूर्वी होते पथदिव्यांची दुरुस्ती-
दरवर्षी गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील सर्व पथदिव्यांची दुरुस्ती पूर्ण केली जाते. १४ व्या वित्त आयोगातून गावातील पूर्ण प्राथमिक शाळांना देखील सहकार्य करता आलेय याचे समाधान वाटत असल्याचे सरपंच रविंद्र शिंगे यांनी सांगितले. तसेच बुरंबावडे गावात कोरोनाच्या संकटात
मास्क, सॅनिटायझर चे वाटपही करण्यात आलेले, असे त्यांनी सांगितले.

बॉक्स-
बुरंबावडे गाव अजून सर्व सोयीसुविधांनी युक्त झाला पाहिजे, तसेच विशेष करून शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असे सरपंच रविंद्र शिंगे यांनी ‘कोकण नाऊ मीडिया ग्रुप’शी बोलताना सांगितले.​​


अंक ४, आदर्श गाव – आदर्श सरपंच, ​बुरंबावडे​.  ​​ 

Leave a Reply

%d bloggers like this: