बापर्डे – विकासाच्या एकजुटीचं मॉडेल 

​संकलन : साईनाथ गावकर ​
माजी आमदार कै. अमृतराव तथा दादा राणे यांचा वारसा लाभलेले बापर्डे हे सर्वांगसुंदर गाव! खरंतर, गावासाठी व देवगड तालुक्यासाठी कै. अमृतराव तथा दादा राणे यांनी दिलेले योगदान हे तितकेच उल्लेखनीय आहे, त्यामुळेच अगदी सुरुवातीलाच बापर्डे गावाचे भूषण असलेल्या कै. दादा राणेंच्या आठवणीशिवाय या आदर्श गावाची माहिती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. बापर्डे या ‘आदर्श गावचा, आदर्श सरपंच’ असलेल्या संजय लाड यांनी गावच्या विकासाचा महत्वाचा पाया कै. अमृतराव राणे यांनी रोवला असल्याचे त्यांच्याशी झालेल्या संवादात वारंवार सांगितले.

माजी आमदार कै. अमृतराव तथा दादा राणे

बापर्डे गावाचा विकास करण्यासाठी बापर्डे ग्रामपंचायत नेहमीच तत्पर असते. ग्रामपंचायतीच्यावतीने गावात लोकांच्या हिताची अनेक विकासकामे करण्यात आलेली आहेत. मग ती स्वच्छता मोहीम असू देत किंवा पर्यावरणपूरक कामे असूदेत. ग्रामपंचायत लोकांच्या सहभागाने गावाचा विकास करते. सन २०१७-१८ मध्ये देवगड तालुक्यातील पहिली ISO 9001 : 2015 मानांकन प्राप्त तसेच देवगड तालुक्यातील पहिली ई-पेपरलेस ग्रामपंचायत तसेच सन २०१७-१८ मध्ये देवगड तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणुन सन्मानित होणारी दुसरी ग्रामपंचायत आहे. बापर्डे गावात महिलांच्या सबलीकरणासाठी गावामध्ये ३३ बचत गटांची निर्मिती करण्यात आली व त्यांना तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन शिबिरे ग्रामपंचायतीच्यावतीने गावात आयोजित करण्यात येतात. गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत बापर्डे सरपंच संजय हनुमंत लाड , उपसरपंच रमेश दिनकर देवळेकर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री.एस.डी.राठोड, सर्व कर्मचारीवर्ग तसेच गावातील महिला व ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित चाकरमानी मिळून- मिसळून पुढाकार घेत असतात हे खऱ्या अर्थाने या गावाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

बायोगॅस सयंत्र उभारण्यात केली नंबर १ कामगिरी

असे केले कोरोनाच्या संकटात काम?

कोरोनाच्या संकटात विविध माध्यमांमधून बापर्डे ग्रामपंचायतीने भरीव कामगिरी केली आहे. कोरोना महामारीबाबत घरोघरी जाऊन माहिती देणे व जनजागृती करणे, तसेच बॅनर/पोस्टरव्दारे जनजागृती केली. गावातील नागरिकाना कोरोना आजार लक्षणे, घ्यावयाची काळजी, सामाजिक अंतर पाळणे इत्यादिंबाबत, भेटींव्दारे, ऑडीओ, लाऊडस्पीकर इत्यादीद्वारे माहिती दिली गेली. सामाजिक माध्यमे, वॉटसप,फेसबुक इत्यादीद्वारे माहिती देण्यात आली. गावातील किराणा दुकान व इतर अत्यावश्यक सेवा देणा-या दुकानदारांकडुन सामाजिक अंतर राखण्यासाठी चुन्याद्वारे मार्किंग करण्यात आले. गावात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी हात धुण्यसाठी वॉश बेसिन बांधण्यात आले. ग्रामपंचायत बापर्डेमार्फत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. NGO या संस्थेव्दारे गावातील नागरिकाना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. तसेच मराठा समाजामार्फत साबण वाटप करण्यात आले. कोव्हीड तपासणीसाठी डिजीटल थर्मामीटर व पिपीई किट खरेदी करण्यात आले असल्याची माहिती सरपंच संजय लाड यांनी ‘कोकण नाऊ मीडिया ग्रुप’ शी बोलताना दिली.

ग्रामसेवक श्री. राठोड

बापर्डे गावातील शैक्षणिक क्रांती

बापर्डे गावात वर्षानुवर्षे माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. कै. माजी आमदार अमृतराव तथा दादा राणे यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थ व चाकरमान्यांना एकत्र आणून यशवंतराव राणे माध्यमिक विद्यामंदिरची उभारणी करण्यात आली. या शाळेत मागील दहा वर्षापासून हजारोनी विद्यार्थी घडलेत. मागील सलग पाच वर्षे दहावीचा निकाल १०० टक्के लागत असून बापर्डे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ९६ टक्केपर्यंत गुण मिळवून देणारे हे विद्यालय आहे. कै. राणे यांच्या पश्चात या शाळेचा आर्थिक भार डॉ. सुहास राणे यांच्या मार्गदर्शनातून गावातील ग्रामस्थ व चाकरमानी उचलत आहेत. भविष्यात या शाळेला शासन दरबारी योग्य तो न्याय मिळावा, अशी विनंती सरपंच संजय लाड यांनी बोलताना व्यक्त केली.

चाकरमान्यांचे आभार मानावे तेवढे कमीच

कोरोनाच्या संकटात १००० पेक्षा अधिक चाकरमानी बापर्डे गावात आले. या सर्वांना कुठल्याही सोयीसुविधाची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक वाडीवर कोरोना कृती समितीची स्थापना करण्यात आलेली. या समितीतील सर्व सदस्यांनी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी बहुमूल्य असे सहकार्य केले. तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व चाकरमान्यांनी साफसफाई देखील केली याचा निश्चितच अभिमान वाटतो. तसेच सर्व चाकरमान्यांनी शासनाने दिलेल्या सर्व अटींचे तंतोतंत पालन केले, त्यामुळे चाकरमान्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, अशी बोलकी प्रतिक्रिया सरपंच संजय लाड यांनी व्यक्त केली. तसेच उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चित्रा पाटील, आरोग्य सेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे देखील सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

बायोगॅस सयंत्र उभारण्यात केली नंबर १ कामगिरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूण ९० बायोगॅस सयंत्र उभारण्याचे उद्दिष्ट होते. पण देवगड तालुक्यातील बापर्डे या एकट्या ग्रामपंचायतीने एका वर्षात गावात ५४ बायोगॅस बांधले. ही सर्व बायोगॅस सयंत्र आजच्या घडीला सुरू आहेत. अर्थात याचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य विश्वास नाईकधुरे यांचे आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच संजय लाड यांनी बोलताना व्यक्त केली. गावातील पाणी, बायोगॅस, कचराकुंडी, सौरपथदीप, शौचालय, शोषखड्डे व्यवस्था फारच उत्तमपद्धतीने करण्यात आली आहे.

ग्रामसेवक श्री. राठोड आहेत ‘टॅलेंटेड’

बापर्डे ग्रामपंचायतीला लाभलेले ग्रामसेवक शिवराज राठोड हे उच्चशिक्षित असून हुशार आहेत. त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विविध पुरस्कार मिळवले. ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना चांगली साथ दिली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत बापर्डेला ‘टॅलेंटेड ग्रामसेवक’ लाभला असल्याची प्रतिक्रिया सरपंच संजय लाड यांनी व्यक्त केली.

श्री. संजय हनुमंत लाड- सरपंच
रमेश दिनकर देवळेकर- उपसरपंच
सदस्य- विश्वास सहदेव नाईकधुरे
गुणवंत जयराम राणे
सुर्यकांत विश्राम येझरकर
सौ. सिमा सुहास नाईकधुरे
सौ. श्वेता शरद नाईकधुरे
सौ.प्रियांका प्रविण राणे
श्रीम.रेवती शंकर मोंडकर
सुविधा सुनिल दुसनकर
ग्रामसेवक- शिवराज राठोड
केंद्रचालक- सचिन नाईकधुरे
शिपाई- प्रशांत देवळेकर
लिपिक- श्रीम. योगिनि राणे
नळकामगार- सरोज शाहु नाईकधुरे
ग्रामरोजगार सेवक- विजय मेस्त्री​​

Leave a Reply

%d bloggers like this: